नागपूरच्या ओम क्रीडा मंडळाला सुवर्णपदक
By Admin | Updated: October 14, 2014 00:19 IST2014-10-14T00:12:54+5:302014-10-14T00:19:11+5:30
अकोला येथे विदर्भ राज्य व आंतरजिल्हा कॅरम स्पर्धा

नागपूरच्या ओम क्रीडा मंडळाला सुवर्णपदक
अकोला: विदर्भ राज्य व आंतर जिल्हा कॅरम स्पर्धेचे सांघिक विजेतेपद नागपूरच्या ओम क्रीडा मंडळाने नागपूरच्याच नवल कॅरम इन्स्टिट्युटचा पराभव करून सुवर्णपदक पटकाविले. नवल कॅरम इन्स्ट्यिुट रौप्यपदकाचे मानकरी ठरले, तर नवयुवक क्रीडा मंडळ नागपूर या चमूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. संपूर्ण स्पर्धेवर नागपूरकरांचे वर्चस्व राहिले. सांघिक विजेतेपद स्पर्धेत ओम क्रीडा मंडळाच्या विशाल रामटेके याने नवल मंडळाच्या सुरज दोडके याच्यावर २५-११, ४-२५, २५-१२ अशी मात केली. ओम मंडळाच्याच नीलेश जांभुळकर याने नवलच्या मनीष टेंभुर्णेवर २५-१२,२५-१५ अशी मात केली. ओम मंडळाच्या तोमेश्वर पराते- रोहित सकते यांनी नवलच्या विजय कनोजिया-विजय वानखेडे यांच्यावर १६-१८, २५-0, १८-१२ अशी मात केली. पुरुष एकेरीत बुलडाण्याच्या शेख नाजीम याने माजी राज्य विजेता नितीन मेश्राम (राय क्लब नागपूर) याचा २२-११,२५-१४ असा सरळ दोन गेममध्ये पराभव करून स्पर्धेत खळबळ उडवून दिली. दुसर्या सामन्यात बुलडाण्याच्या मोहम्मद तौसिफ याने नागपूरच्या नवल मंडळच्या सुरज दोडके याचा २५-५, १७-२५, २५-१३ अशा संघर्षपूर्ण लढतीत पराभव करून आश्चर्याचा धक्का दिला. बाश्रीटाकळी येथील स्टार क्लबचा शेख मेहबूब याने बाश्रीटाकळीच्याच शेख इमामला २५-१७, १६-२५, २५-१0 असे पराभूत केले. नागपूर येथील वरिष्ठ राष्ट्रीय खेळाडू शंकर मामडीवार याने बुलडाण्याचा मो. साजीद याचा २५-0,२५-४ असा सणसणीत पराभव केला. ओम मंडळाच्या विशाल रामटेके याने बाश्रीटाकळीच्या आमीर खान याचा २५-१५,२५-४ असा पराभव केला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक प्रदान करण्यात आले.