वाशिम शहरात ट्रकच्या धडकेने वृद्ध ठार
By Admin | Updated: February 2, 2016 01:56 IST2016-02-02T01:56:50+5:302016-02-02T01:56:50+5:30
वृद्धाचा घटनास्थळीच मृत्यू.

वाशिम शहरात ट्रकच्या धडकेने वृद्ध ठार
वाशिम: शहरातील पाटणी चौकामध्ये असलेल्या दुभाजकावरून पायी चालणार्या इसम अचानक धावत्या ट्रकच्या चाकाखाली आला असून, त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना १ फेब्रुवारीला दुपारी १.३0 वाजता घडली. सिव्हिल लाइन परिसरातील एरिगेशन कॉलनीमध्ये वास्तव्यास असलेले आनंदा अमृता केकन (७५) हे पाटणी चौकामध्ये खासगी कामानिमित्त आले होते. पाटणी चौकामधील दुभाजकावरून पायी चालत असताना पाय घसरून ट्रकच्या चाकाखाली आले. यामध्ये केकन याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची केकन यांच्या नातेवाइकांनी वाशिम शहर पो.स्टे.मध्ये फिर्याद नोंदविली. पोलिसांनी ट्रकचालक एमएच ३७ टी ६९८९ याच्या विरुद्ध ३0४ ह्यअह्ण गुन्हा दाखल केला.