अधिका-यांनी समन्वयाने काम करावे

By Admin | Updated: September 28, 2014 00:07 IST2014-09-27T23:55:54+5:302014-09-28T00:07:54+5:30

वाशिम जिल्हा निवडणूक अधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांचे र्निदेश.

Officials should work with coordination | अधिका-यांनी समन्वयाने काम करावे

अधिका-यांनी समन्वयाने काम करावे

वाशिम : मतदार जागृती अभियान राबवत असताना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) आणि क्षेत्रीय अधिका-यांनी परस्पर समन्वयाने काम करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित क्षेत्रीय अधिकारी व बी.एल.ओ. यांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बी.के. इंगळे उ पस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी आतापयर्ंत राबवण्यात आलेल्या मतदार जागृ तीविषयक अभियानाचा आढावा घेतला.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले कि, गत विधानसभा व नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर कमी मतदान झाले आहे, त्या मतदान केंद्राच्या परिसरात जास्तीजास्त मतदार जागृती करणे आवश्यक आहे. विविध उपक्रम, प्रत्यक्ष भेटी, फलक या सारख्या माध्यमातून मतदारांना मतदान करण्यासाठी आव्हान करावे, अश्या सूचना जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी यावेळी दिल्या.

Web Title: Officials should work with coordination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.