अधिका-यांनी घेतला धसका
By Admin | Updated: September 26, 2014 00:39 IST2014-09-26T00:39:20+5:302014-09-26T00:39:20+5:30
लोकमत स्टिंग ऑपरेशनाचा धसका, शासकीय वाहनांचा गैरवापरास लगाम.

अधिका-यांनी घेतला धसका
वाशिम : शासकीय वाहनांचा वापर अधिकार्यांकडून खासगी कामासाठी केला जात असल्याचा लोकमतच्या वृत्ताचा जिल्हयातील अधिका-यांनी धसका घेतल्याचे चित्र आज २५ सप्टेंबर रोजी पहावयास मिळाले. वाशिम जिल्हा मुख्यालयी कार्यरत असणारे व दररोज बाहरेगावाहून अपडाउन करणारे अधिकारी खासगी कामासाठी शासकीय वाहनाचा वापर करीत असल्याबाबत लोकमतने स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातुन उघड केले होते. त्यामुळे गुरुवार २५ सप्टेंबर रोजी एकही शासकीय वाहन बसस्थानक व रेल्वेस्थानकाकडे फिरकलेच नाही . आज रेल्वे येण्याच्या आधी व रेल्वे निघून गेल्यानंतरही लोकमतची चमू १५ मिनिटे तेथे थांबली होती. अधिका-याना ने आण करण्याकरिता शासकीय गाडयांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे बुधवार २४ सप्टेंबर रोजी लोकमतने स्टिंग ऑपरेशन मोहीम राबवून शासकीय अधिकारी शासनाच्या गाडयाचा गैरवापर करीत असल्याचे बिंग फोडले होते. लोकमत चमुने केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा धसका घेतला व दररोज दिमतीला असणार्या शासकीय गाडयांवर रेल्वेस्थानक व बसस्थानकावर घेण्यासाठी बोलवले नसल्याचे २५ सप्टेंबर रोजी लोकमत चमुच्या निदर्शनास आले. अधिकार्यांना शासकीय कामांना तसेच मिटींगला हजर राहण्यासाठी शासकीय वाहनांचा वापर करता येतो. मात्र वैयक्तिक अथवा खासगी कामांसाठी शासकीय वाहन वापरण्याचा अधिकार नाही. लोकमत चमुने राबविलेल्या स्टिंग ऑपरेशनची आपण दखल घेतली असून आपल्या अधिकार्यांना व कर्मचार्यांना वैयक्तिक किंवा खासगी कामासाठी शासकीय वाहन वापरु नये, अशा तोंडी व आपण लेखी सुचना दिल्या असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेखा मेंढे यांनी सांगीतले.