कृषी विभागाचे अधिकारी पोहचले शेतात

By Admin | Updated: September 21, 2014 00:04 IST2014-09-20T22:17:12+5:302014-09-21T00:04:41+5:30

लोकमत वृत्ताची दखल; कृषी अधिक्षकांसह वाशिम जिल्हयात अधिका-यांनी केली पाहणी.

Officers of the Agriculture Department arrived in the field | कृषी विभागाचे अधिकारी पोहचले शेतात

कृषी विभागाचे अधिकारी पोहचले शेतात

वाशिम : जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी झालेल्या एकूण २ लाख ९६ हजार ५१९ हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास २0 टक्के क्षेत्रावरील पिक आजमितीला किडीने संपल्यात जमा झाले आहे. या संदर्भात लोकमतने १९ सप्टेंबर रोजी वृत्त प्रकाशित करताच २0 सप्टेंबर रोजी सकाळीच कृषी विभागाची टिमने शेतात जावून पिकाची पाहणी व मार्गदर्शन केले.
जिल्ह्यात चालू खरिप हंगामात एकूण ४ लाख ११ हजार ९९४ हेक्टरवर ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सुर्यफूल, तिळ, सोयाबीन, कपाशी, उस, आदी पिकांची पेरणी करण्यात आली होती. यामध्ये सर्वात जास्त पेरा सोयाबीनचा आहे. दूबार पेरणीनंतर शेतक-यांना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीनला जीवदान मिळाले होते. परंतू जिल्हाभरातील शे तकर्‍यांच्या या आशेवर पिवळा मोझ्ॉक, तंबाखुची पाने खाणारी आळी, खोड सड यासह विविध रोगांनी आक्रमण केल्याने शेतकर्‍यांच्या हातचे पीक जात आहे.
मालेगाव तालुक्यातील अनेक गावात आज कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी भेटी देवून शेतक- यांना मार्गदर्शन केले. पिवळया मोझ्ॉकने करपलेले पिक काढून फेकण्याचा सल्ला शेतक-यांना कृषी विभागाने दिला. २0 सप्टेंबर रोजी मालेगाव तालुक्यासह परिसरातील रोगाचा प्रादूर्भाव झालेल्या िपकांची पाहणी करता जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, तालुका कृषी अधिकारी एम. व्ही. पाटील, वानखेडे, बलखेडे, कृषी पर्यवेक्षक ठाकरे, सोळंके यांच्यासह बरेच कृषी विभागाचे कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Web Title: Officers of the Agriculture Department arrived in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.