महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या वाशिम येथील कार्यालयात कर्मचा-यांची वानवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 19:55 IST2017-09-14T19:54:54+5:302017-09-14T19:55:12+5:30
अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थींना स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे आणि वसूलीसह तत्सम कामे करण्यासाठी किमान ८ कर्मचाºयांची गरज असताना येथील महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात केवळ दोन कर्मचारी कायमस्वरूपी कार्यरत आहेत. यामुळे प्रत्यक्ष कामांवर परिणाम होत असल्याची माहिती कार्यालय अधीक्षक मिलींद धांडे यांनी दिली.

महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या वाशिम येथील कार्यालयात कर्मचा-यांची वानवा!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थींना स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे आणि वसूलीसह तत्सम कामे करण्यासाठी किमान ८ कर्मचाºयांची गरज असताना येथील महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात केवळ दोन कर्मचारी कायमस्वरूपी कार्यरत आहेत. यामुळे प्रत्यक्ष कामांवर परिणाम होत असल्याची माहिती कार्यालय अधीक्षक मिलींद धांडे यांनी दिली.
वाशिम येथील कार्यालयाअंतर्गत सन २००४ पासून १०६१ लाभार्थींना कर्जवाटप करण्यात आले. त्यापैकी आजमिीस ६ कोटी २६ लाख रुपये एवढी रक्कम कर्जदारांकडे थकीत असून अपूºया मनुष्यबळाअभावी गेल्या सहा महिन्यात केवळ २ लाख रुपये वसूली झालेली आहे. पुरेसे कर्मचारी मिळाल्यास कर्जवसूलीची गती वाढविणे शक्य होईल, असे धांडे यांनी सांगितले.