आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा
By Admin | Updated: May 4, 2015 01:10 IST2015-05-04T01:10:17+5:302015-05-04T01:10:17+5:30
मानोरा तालुक्यातील सोमठाणा येथील घटना.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा
मानोरा : सोमठाणा येथील विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीविरुद्ध विविध कलमांन्वये मानोरा पोलिसांनी रविवारी गुन्हे दाखल केले. या प्रकरणी तीन आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तालुक्यातील सोमठाणा येथील पाणी पुरवठा नळयोजनेच्या विहिरीत २ मे रोजी सकाळी ७.३0 वाजताच्या दरम्यान वर्षा किशोर ठाकरे (३४) हिचा मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आकस्मिक मृ त्यूची नोंद केली होती; मात्र मृतक महिलेचा भाऊ शरद खुशालराव बाकल (३२) यांनी पोलीस स्टेशनला अशी तक्रार दिली, की माझ्या बहिणीचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. छळामुळे बहिणीने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याची तक्रार शरद बाकल यांनी दिली. या फिर्यादीवरून मानोरा पोलिसांनी आरोपी पांडुरंग मोतीराम ठाकरे, किशोर पांडुरंग ठाकरे, राजू ऊर्फ राजेंद्र रामराव ठाकरे व बाली ऊर्फ अर्चना किरण मिसाळ यांच्याविरुद्ध कलम ४९८ अ, ३0६, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.