विवाहितेच्या छळप्रकरणी गुन्हा

By Admin | Updated: January 15, 2015 00:26 IST2015-01-15T00:26:13+5:302015-01-15T00:26:13+5:30

मंगरूळपीर पोलिसांनी केला सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल.

Offense of Marriage | विवाहितेच्या छळप्रकरणी गुन्हा

विवाहितेच्या छळप्रकरणी गुन्हा

मंगरूळपीर (वाशिम) : लग्नात हुंडा कमी दिला व मोहरून एक लाख रूपयांची मागणी करीत विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी सुरेखा ऊर्फ संध्या भारत राठोड रा.नवीन सोनखास येथील महिलेने १३ जानेवारी रोजी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारत आत्माराम राठोड, आत्माराम वसाराम राठोड, सुषमा आत्माराम राठोड, भूपेन्द्र आत्माराम राठोड, ममता आत्माराम राठोड व संगीता सवाईराम राठोड यांच्या विरूद्ध कलम ४९८ (अ) ,५0४, ५0६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Offense of Marriage