शासकीय कामात अडथळा; गुन्हा दाखल

By Admin | Updated: November 18, 2016 02:29 IST2016-11-18T02:29:22+5:302016-11-18T02:29:22+5:30

रिसोड येथील घटना.

Obstruct government work; Filing a complaint | शासकीय कामात अडथळा; गुन्हा दाखल

शासकीय कामात अडथळा; गुन्हा दाखल

रिसोड, दि. १७- चलनातून बाद झालेल्या नोटा बदलण्यासाठी बँकेसमोरील रांगेत उभे राहण्यावरून वाद घालणार्‍या युवकाविरूद्ध गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
रिसोड येथे गुरूवारी एका युवकाने नोटा बदलण्यासाठी स्टेट बँकेसमोरील रांगेत उभे राहण्यावरून पोलिस कर्मचार्‍याशी वाद घातला. पोलीस कर्मचारी विठ्ठल सांगळे यांनी फिर्याद दिली, नोटा बदलण्याकरिता आलेल्या एका युवकाने रांगेत उभे न राहता मी देशरक्षक आहे व मला रांगेत उभे राहण्याची गरज नाही, असे म्हणून वाद घालून जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून विशाल जाधव रा.मोठेगाव याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कलम ३५३, ३३२ भादंवी अन्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: Obstruct government work; Filing a complaint