वाहतूक नियमांना ठेंगा; ७६० जणांवर कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:44 IST2021-08-22T04:44:23+5:302021-08-22T04:44:23+5:30
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे वाहन चालविताना मास्कचा वापर ...

वाहतूक नियमांना ठेंगा; ७६० जणांवर कारवाई!
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे वाहन चालविताना मास्कचा वापर करावा, ट्रिपल सीट प्रवास करू नये, वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे. अनेक जण विनामास्क वाहन चालवितात तसेच वाहतूक नियम पाळत नाहीत. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी वाहतूक नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शहर वाहतूक शाखेतर्फे वाहतूक नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. विना नंबर, फॅन्सी नंबर प्लेट, परवाना नसणे, मास्क नसणे, ट्रिपल सीट आदी कारणांवरून गत सात दिवसांत ७६० वाहनधारकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. वाहनचालकांनी वाहतूक नियमाचे पालन करावे, अशा सूचना वाहतूक शाखेने दिल्या.