रोपवाटिका व्यवस्थापन, लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:07 IST2021-05-05T05:07:23+5:302021-05-05T05:07:23+5:30

वाशिम : खरीप हंगामातील कांद्याला बाजारात अधिक दर मिळतात व इतर पिकांच्या तुलनेत चांगले उत्पन्न मिळते. त्या दृष्टीने ...

Nursery management, planting technology training! | रोपवाटिका व्यवस्थापन, लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण !

रोपवाटिका व्यवस्थापन, लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण !

वाशिम : खरीप हंगामातील कांद्याला बाजारात अधिक दर मिळतात व इतर पिकांच्या तुलनेत चांगले उत्पन्न मिळते. त्या दृष्टीने शेतकऱ्यांना खरीप कांदा पीक उत्पादनाविषयी मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली पुरस्कृत कृषी विज्ञान केंद्र, वाशिमच्या वतीने ‘खरीप कांदा -रोपवाटिका व्यवस्थापन व लागवड तंत्रज्ञान’ या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र, वाशिमचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. रवींद्र काळे हे अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या निवृत्ती पाटील उपस्थित होते. तांत्रिक मार्गदर्शनात निवृत्ती पाटील यांनी कांदा हे भारतीय आहारातील महत्त्वाचे पीक असून फळे व भाजीपाला पिकामध्ये सर्वांत जास्त परदेशी चलन पीक असल्याचे स्पष्ट केले.

परंतु इतर देशांच्या तुलनेत भारताची उत्पादकता खूप कमी असून इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची उत्पादकतासुद्धा कमी असल्याचे सांगून त्यामागील महत्त्वाची कारणे व संभाव्य उपाय याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

खरीप हंगामातील कांदा लागवडीतील बारकावे विषद करताना योग्य जमिनीची निवड, योग्य व शिफारशीत वाणांचा वापर, बीज प्रक्रिया व रोपवाटिका व्यवस्थापन, अन्नद्रव्य व ओळीत व्यवस्थापन आणि कीड रोग व्यवस्थापन आदींविषयी सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. रवींद्र काळे यांनी शेतकऱ्यांनी बहु पीक पद्धतीचा अवलंब करून आपली आर्थिक परिस्थिती मजबूत करावी व त्यादृष्टीने अधिक बाजारभाव व जास्त नफा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने खरीप हंगामात कांदा उत्पादन घ्यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीकृष्ण बावस्कर यांनी केले.

Web Title: Nursery management, planting technology training!