कोरोना रुग्णांची संख्या घटली; माध्यमिक शाळांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:44 IST2021-08-27T04:44:08+5:302021-08-27T04:44:08+5:30

वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असताना कोरोनामुक्त गावातील माध्यमिकच्या सुरू होणाऱ्या शाळांची संख्या वाढत आहे. महिनाभरात ...

The number of corona patients decreased; The number of secondary schools increased | कोरोना रुग्णांची संख्या घटली; माध्यमिक शाळांची संख्या वाढली

कोरोना रुग्णांची संख्या घटली; माध्यमिक शाळांची संख्या वाढली

वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असताना कोरोनामुक्त गावातील माध्यमिकच्या सुरू होणाऱ्या शाळांची संख्या वाढत आहे. महिनाभरात ६४ शाळा आणखी सुरू झाल्या असून, या शाळांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची संख्याही वाढली आहे. महिनाभरापूर्वी २० जुलै रोजी जिल्ह्यात ८१ शाळा सुरू झाल्या होत्या, तर २७ ऑगस्टच्या अहवालानुसार १४५ शाळा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे शाळेत विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे.

काेरोनामुक्त गावांत ग्रामपंचायतचे संमतीपत्र प्राप्त झाल्यानंतर शासन निर्देशानुसार माध्यमिकच्या शाळा सुरू करण्याच्या प्रक्रियेला आरंभ झाला. त्यात २० जुलैपर्यंत आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ८१ शाळा सुरू झाल्या, तर १९३ शाळांसाठी स्थानिक प्रशासनाच्या परवानगीअभावी सुरू होऊ शकल्या नव्हत्या. दरम्यान, जिल्ह्यात ४१९ ग्रामपंचायतींपैकी ४८० ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या असून, आता कोरोना रुग्णांची संख्याही घटू लागल्याने कोरोनामुक्त गावांतील शाळांची संख्या वाढू लागली आहे. जि.प. शिक्षण विभागाच्या अहवालानुसार २७ ऑगस्ट रोजीपर्यंत कोरोनामुक्त गावांतील १४५ शाळा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, अद्यापही जवळपास ३३६ ग्रामपंचायतीअंतर्गत कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

-------

उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या वाढली

त्यातही २० ऑगस्ट रोजी ८१ शाळांत ७५ हजार ७६० विद्यार्थ्यांपैकी केवळ २२६ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. हे प्रमाण प्रत्यक्ष संख्येच्या केवळ ३.१९ टक्के होते, तर आता १४५ शाळांत ८८६० विद्यार्थी उपस्थित असून, हे प्रमाण प्रत्यक्ष संख्येच्या १२.६३ टक्के आहे. अर्थात, सुरू झालेल्या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या चौपटीने वाढली आहे.

००००००००००

१३० शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा

जिल्ह्यात माध्यमिकच्या अर्थात आठवी ते बारावीच्या शाळांची संख्या २७५ आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याने जवळपास ४८० ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या असून, या ग्रामपंचायतीअंतर्गत आठवी ते बारावीच्या १४५ शाळाच सुरू झालेल्या आहेत, तर अद्यापही १३० शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

०००००००००

कोरोना रुग्ण आढळल्यानंतर २ शाळा बंद

कोरोनामुक्त गावांत ग्रामपंचायतचे संमतीपत्र मिळाल्यानंतरच आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात येत असून, या गावांत पुन्हा कोरोना रुग्ण आढळल्यानंतर तेथील शाळा बंद करावी लागत आहे. आजवर मानोरा आणि रिसोड तालुक्यातील प्रत्येकी एका गावात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर तेथील शाळा बंद करावी लागल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

०००००००००००००००००००००००

कारंजा तालुक्यात विद्यार्थ्यांची उपस्थिती सर्वाधिक

जिल्ह्यात आठवी ते बारावीपर्यंत ७५,७६० विद्यार्थीसंख्या आहे. २७ ऑगस्टपर्यंत एकूण ८८६० विद्यार्थी शाळेत हजर असल्याचे अहवालावरून दिसत आहे. हे प्रमाण १२.६३ टक्के आहे, त्यात कारंजा तालुक्यात सर्वाधिक २१.५२, मालेगावात १५.७१, मंगरुळपीर तालुक्यात १३.७८, वाशिम तालुक्यात १२.०३, रिसोड तालुक्यात ७. ४०, तर मानोरा तालुक्यात ५.५७ टक्के उपस्थितीचे प्रमाण आहे.

००००००००

- आठवी ते बारावीच्या एकूण शाळा - २७५

- सुरू झालेल्या शाळा - १४५

- विद्यार्थ्यांची एकूण संख्या - ७५,२६०

- उपस्थित विद्यार्थी - ८८६०

००००००००००

सुरू झालेल्या शाळा व उपस्थित विद्यार्थी

तालुका - शाळा - विद्यार्थी

कारंजा - ३७ - १७५०

मालेगाव - ३६ - १९७१

मं.पीर - १२ - ११२०

मानोरा - ११ - ६३०

रिसोड - २७ - १४१२

वाशिम- २२ - १९७७

००००००००००००००००००

Web Title: The number of corona patients decreased; The number of secondary schools increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.