शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

महसूल, पोलीस खात्यातच लाचखोरांचे प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 05:02 IST

प्रशासन भ्रष्टाचारमुक्त व्हावे, यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागही भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ‘वॉच’ ठेऊन आहे. ...

प्रशासन भ्रष्टाचारमुक्त व्हावे, यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागही भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ‘वॉच’ ठेऊन आहे. असे असताना २०१९ ते २०२१ या कालावधीत जिल्ह्यातील प्रशासकीय विभागात भ्रष्टाचार झाल्याची ४० प्रकरणे उघडकीस आली, तर ३० प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे पोलीस व महसूल खात्यातीलच आहे. दोन वर्षांत १० पोलीस कर्मचारी व आठ महसूल कर्मचाऱ्यांनी लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्या खालोखाल लाचखोर कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षण विभागाचा क्रमांक लागतो. २०१९ मध्ये या विभागातील तीन कर्मचारी लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले. यासह नगरपरिषद, भूमी अभिलेख, समाज कल्याण, सहकार, कृषी, ऊर्जा विभागातही लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आली.

..................

वयोगटानुसार पकडलेले शासकीय कर्मचारी

वर्ष २०१९ - २० ते ३० - ०३, ३१ ते ४० - ०८, ४१ ते ५० - ०८, ५१ ते ६० - ०२

वर्ष २०२० - २० ते ३० - ००, ३१ ते ४० - ०५, ४१ ते ५० - ०५, ५१ ते ६० - ०७

वर्ष २०२१ - २० ते ३० - ०१, ३१ ते ४० - ०१, ४१ ते ५० - ००, ५१ ते ६० - ००

......................

बॉक्स :

३१ ते ४० मधील कर्मचाऱ्यांना पैशाचा मोह आवरेना

१) लाच स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वयोगटानुसार वर्गीकरण केले असता, ३१ ते ४० या वयोगटांतील कर्मचाऱ्यांचाच त्यात अधिक भरणा असल्याचे दिसून येत आहे. २०१९ ते २०२१ या कालावधीत या वयोगटातील १४ कर्मचाऱ्यांनी पैशाच्या मोहाला बळी पडून लाच स्वीकारली. संबंधितांवर ‘अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो’कडून कारवाई करण्यात आली.

२) २०१९ मध्ये ४ पोलीस कर्मचारी, १ महसूल कर्मचारी, १ न.प. कर्मचारी, १ भूमी अभिलेख, २ नगरपंचायत, ३ शिक्षण विभाग, २ कृषी विभाग, २ ऊर्जा विभाग व ३ खासगी/इतर लोकसेवकांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

३) २०२० मध्ये ७ महसूल कर्मचाऱ्यांनी लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. पोलीस विभागातील ६ कर्मचारी, ऊर्जा, सहकार व पंचायत विभागातील प्रत्येकी एका कर्मचाऱ्यास या प्रकरणी जेरबंद करण्यात आले, तर २०२१ मध्ये ग्रामविकास आणि पंचायत विभागातील कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली.

...................

कोट :

लाचलुचपत प्रतिबंधक विभागास तक्रार करणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातात. तक्रार प्राप्त झाल्यानंतर सापळा रचून २०१९ ते २०२१ या कालावधीत एकूण ४० कारवाया करण्यात आल्या. सखोल तपासाअंती त्यातील ३० प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रशासकीय विभागात कुठेही आणि कोणीही लाच मागत असल्यास नागरिकांनी कुठलीही भीती न बाळगता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करावी. तत्काळ दखल घेतली जाईल.

- निवृत्ती बोराडे

लाचलुचपत विभाग, वाशिम