न.प. मुख्याधिका-याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
By Admin | Updated: February 8, 2016 03:13 IST2016-02-06T02:30:07+5:302016-02-08T03:13:16+5:30
भावाला फायदा मिळण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून अभिलेखामध्ये चुकीच्या नोदीं केल्याचा आरोप.

न.प. मुख्याधिका-याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
वाशिम: वाशिम नगर परिषदेमध्ये प्रभारी पदावर कार्यरत असताना दीपक इंगोले यांनी आपल्या भावाला फायदा मिळण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून अभिलेखामध्ये सन २0१३ मध्ये नोंद केली. या प्रकरणी वाशिमचे उपविभागीय अधिकारी संदिपान सानप यांचे तक्रारीहून वाशिम पोलिसांनी ४ फेब्रुवारीला इंगोले यांचेविरूध्द भादंविचे कलम ४२0, ४६८, ४७१, १६७ प्रमाणे गुन्हा नोंदविला. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे दीपक इंगोले मुख्याधिकारी या पदावर सन २0१३ मध्ये कार्यरत होते. त्यावेळी वाशिम येथील नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा प्रभारही त्यांचेकडे होता. त्यावेळी त्यांनी २८ ऑक्टोबर २0१३ ते १३ नोव्हेंबर २0१३ च्या कालावधीमध्ये स्वत:च्या सख्ख्या भावाच्या संस्थेची अभिलेखामध्ये नोंद करण्यासाठी बनावट दस्तावेज तयार करून शासनाची दिशाभुल व फसवणुक केली. या प्रकरणी वाशिम येथील उपविभागीय अधिकारी सानप यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये ४ फेब्रुवारीला फिर्याद नोंदविली. या फिर्यादीहून पोलीसांनी मुख्याधिकारी इंगोले यांचेविरूध्द भादंविचे कलम ४२0, ४६८, ४७१, १६७ प्रमाणे गुन्हा नोंदविला. पुढील तपास वाशिम पोलीस करीत आहेत.