आता अंगणवाडीकरिता सेविका व समुपदेशक पदे
By Admin | Updated: December 22, 2014 23:48 IST2014-12-22T23:48:22+5:302014-12-22T23:48:22+5:30
राज्यातील २0 जिल्हयाचा समावेश.

आता अंगणवाडीकरिता सेविका व समुपदेशक पदे
वाशिम : एकात्मिक बाल विकास सेवा योजना बळकटीकरण व पुनर्संंरचना या योजनेंतर्गंंत देशात निवड करण्यात आलेल्या जिल्हयांमधील अंगणवाडी केंद्राकरीता अतिरिक्त अंगणवाडी सेविका व पोषण समुपदेशक पदे निर्माण करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील २0 जिल्हयाचा समावेश आहे.
अतिरिक्त अंगणवाडी सेविका व पोषण समुपदेशक हे पदे मानधनावर असून पूर्वीच्या नियमित अंगणवाडी सेविका , अंगणवाडी मदतनीस या संवर्गापासून वेगळे असून तीन हजार रूपये एवढे मानधन निश्चित करण्यात आले आहे. राज्याच्या २0 जिल्हयांमध्ये ही पदे भरतेवेळी दहावी उतीर्ण असलेल्या व दोन वर्ष सेवा झालेल्या मदतनीसांना नियुक्ती दयावयाची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यास शासनाने काही अटींच्या अधिन राहून मान्यता दिली आहे. त्यामध्ये केंद्र व राज्याचा हिस्सा निश्चित केलेले मानधन देय राहील या व्यतिरिक्त कोणतेही मानधन देण्यात येणार नाही. या पदांना केंद्रशासनाची मान्यता असे पर्यंंतच कार्यरत राहील, सेवासमाप्तीनंतरचे एक रकमी लाभ योजना लागू राहणार नाही या बाबींचा समावेश आहे.
*मानधन निश्चित करण्यात आलेल्या खर्चात केंद्राचा हिस्सा ७५ टक्के व राज्याचा हिस्सा २५ टक्के आहे. या पूर्वीच्या अंगणवाडी सेविका, मदतनीसकरीता केंद्राचा हिस्सा ९0 टक्के व राज्याचा हिस्सा १0 टक्के आहे. या व्यतिरिक्त या मानधनी पदाकरीता राजयाचे अतिरिक्त मानधन देण्यात येणार नाही.