वाशिम जिल्ह्यात आता केवळ महिला बचत गटानांच मिळणार रास्तभाव दुकानांचे परवाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 15:55 IST2017-11-08T15:48:43+5:302017-11-08T15:55:49+5:30
वाशिम : विविध कारणांमुळे ३२ गावांतील रास्तभाव दुकाने थांबविण्यात आली असून, तेथे नव्याने निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दरम्यान, आता केवळ महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनाच प्राधान्य राहणार आहे.

वाशिम जिल्ह्यात आता केवळ महिला बचत गटानांच मिळणार रास्तभाव दुकानांचे परवाने
वाशिम : विविध कारणांमुळे ३२ गावांतील रास्तभाव दुकाने थांबविण्यात आली असून, तेथे नव्याने निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दरम्यान, आता केवळ महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनाच प्राधान्य राहणार असून, महिला बचत गटांनी संबंधित तहसील कार्र्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी बुधवारी केले.
वाशिम तालुक्यातील वाघोली खुर्द, कुंभारखेडा, धारकाटा, खडसिंग, तांदळी शेवई, बिटोडा तेली, उमरा कापसे, कारंजा तालुक्यातील धनज बु., नागलवाडी, पोहा-१, पिंपळगाव खुर्द, रिसोड तालुक्यातील तपोवन, जायखेडा, पाचांबा, केशवनगर, मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी, यशवंतनगर, मालेगाव तालुक्यातील कुरळा, झोडगा खुर्द, रिधोरा, वरदरी खुर्द, किन्हीराजा, धमधमी, पिंपळशेंडा, पांगरखेडा, मंगरूळपीर तालुक्यातील एकांबा, बालदेव, लावणा, भोतसावंगा, शेलगाव, स्वाशीन, वाडा या ३२ गावांमधील रास्तभाव धान्य दुकानांचे परवाने वितरीत करण्यात येणार आहेत. याबाबतच्या सूचना संबंधित ग्रामपंचायत, तहसीलदार कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. रास्तभाव धान्य दुकान चालविण्यासाठी इच्छुक महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०१७ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तहसीलदार कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. विहित नमुन्यातील व परिपूर्ण कागदपत्रांसहित असलेले अर्जच विचारात घेतले जातील, असे वानखेडे यांनी स्पष्ट केले.