न उगवलेल्या बियाण्यांचे सर्वेक्षण होणार -डॉ. प्रशांत घावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 06:33 PM2020-06-20T18:33:20+5:302020-06-20T18:36:00+5:30

 महाबीजचे वाशिम जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रशांत घावडे यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद...

Non-germinated seeds will be surveyed -Dr. Prashant Ghavade | न उगवलेल्या बियाण्यांचे सर्वेक्षण होणार -डॉ. प्रशांत घावडे

न उगवलेल्या बियाण्यांचे सर्वेक्षण होणार -डॉ. प्रशांत घावडे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यंदाच्या खरीप हंगामात शेतकºयांनी पेरलेले सोयाबीन बियाणे न उगवल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, हा प्रकार नेमका का घडला आणि पुढे शेतकºयांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत माहिती घेण्यासाठी  महाबीजचे वाशिम जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रशांत घावडे यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद...


यंदाच्या हंगामात बियाणे न उगवण्याची प्रमुख कारणे कोणती. ?
काही प्रमाणात बियाण्यांची उगवण क्षमता कमी असली तरी, पेरणीची वेळ आणि पद्धतीमुळे हा प्रकार घडत आहे. पुरेसा पाऊस न पडता पेरणी करणे, तसेच पेरणीनंतर पडलेला जोरदार पाऊस ही बि याणे न उगविण्याची कारणे असली, तरी जमिनीत निर्माण झालेली बुरशी, हेसुद्धा बियाणे न उगवण्याचे प्रमुख कारण आहे.  

बिजोत्पादन प्रकल्पातील बियाण्यांबाबत असा प्रकार घडला का?
अद्याप तरी बिजोत्पादन प्रकल्पातील शेतकºयांकडून अशा प्रकारची तक्रार आलेली नाही. तथापि, कि ती शेतकºयांनी पेरणी केली आणि कधी केली. त्यावर हे अवलंबून आहे. बिजोत्पादन प्रकल्पातील शेतकरी मार्गदर्शनानुसारच पेरणी करतात. त्यामुळे त्यांच्याबाबत हा प्रकार घडण्याची शक्यता कमीच आहे. 
 
शेतकºयांनी पेरणीपूर्व बिज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. गतवर्षी अवकाळी पावसानंतर सोयाबीनला मोठा फटका बसला. त्यावेळी शेतात कुजलेल्या सोयाबीनच्या दाण्यांमुळे जमिनीत बुरशी तयार झाली. तसेच शेतकºयांनी पेरणी केल्यानंतर अचानक आलेल्या  जोरदार पावसामुळेही बियाण्यांवर परिणाम होऊन ते उगवले नाही. पुढे पेरणी करताना सर्वच शेतकºयांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Web Title: Non-germinated seeds will be surveyed -Dr. Prashant Ghavade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.