जिल्ह्यात नव्याने एकही रुग्ण आढळला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:47 IST2021-08-21T04:47:10+5:302021-08-21T04:47:10+5:30
जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत ७ हजार ४३० बाधित रुग्ण आढळले; तर दुसऱ्या लाटेत बाधित आढळलेल्यांसह आतापर्यंत एकूण आकडा ...

जिल्ह्यात नव्याने एकही रुग्ण आढळला नाही
जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत ७ हजार ४३० बाधित रुग्ण आढळले; तर दुसऱ्या लाटेत बाधित आढळलेल्यांसह आतापर्यंत एकूण आकडा ४१ हजार ६९६ वर पोहोचला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने बाधित आढळणाऱ्या व्यक्तींची संख्या पाचच्या आतच राहत असून शहरी भाग बहुतांशी कोरोनामुक्त झाल्याची आशादायक स्थिती निर्माण झाली आहे. हे चित्र असेच कायम राहिल्यास लवकरच संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त होईल, अशी शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.
...................
कोरोना चाचण्यांचे प्रमाणही घटले
गेल्या काही दिवसात कोरोना संसर्गाने बाधित रुग्णसंख्या झपाट्याने घटलेली आहे. दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थापित कोरोना चाचणी केंद्रावर दैनंदिन चाचणी करायला येणाऱ्या व्यक्तींच्या प्रमाणातही घट झाली असून जिल्ह्यातील इतर ठिकाणीही हे प्रमाण घटल्याची माहिती सूत्रांनी दिली.
..................
कोट :
जिल्ह्यात चालू महिन्यात दैनंदिन कोरोना बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. आज रोजी ॲक्टिव्ह रुग्ण १५ दिसत असले तरी ते होम क्वारंटाईन आहेत. रुग्णालयांमध्ये एकही रुग्ण उपचारार्थ दाखल नाही.
- डाॅ. मधुकर राठोड
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम
..............
कोरोना बाधितांची सद्य:स्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ४१६९६
ॲक्टिव्ह – १५
डिस्चार्ज – ४१०४३
मृत्यू – ६३७