वाहनाद्वारे निर्माल्य संकलन सुविधा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:26 IST2017-09-04T01:26:07+5:302017-09-04T01:26:45+5:30
वाशिम: सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान गणपतीच्या आरती व पूजेनिमित्त गोळा होणार्या निर्माल्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वाशिम सेंट्रल व अनसूया माता सेवा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने वाहन उपलब्ध करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात या वाहनाद्वारे सेवा देण्यात आली.

वाहनाद्वारे निर्माल्य संकलन सुविधा!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान गणपतीच्या आरती व पूजेनिमित्त गोळा होणार्या निर्माल्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वाशिम सेंट्रल व अनसूया माता सेवा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने वाहन उपलब्ध करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात या वाहनाद्वारे सेवा देण्यात आली.
‘तुमची o्रद्धा आम्ही जोपासू’ या संकल्पनेतून रोटरी क्लब व अनसूया माता सेवा प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थांनी गणेशोत्सव दरम्यान कालावधीत एका विशिष्ट वाहनाद्वारे निर्माल्य संकल्प उपक्रम राविण्यात आला. हा रथ दररोज शहरातील विविध परिसरात फिरून गणपती मंडळाद्वारे पूजेसाठी वापरण्यात आलेले निर्माल्य जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पार पाडली.
निर्माल्य संकलन रथाच्या माध्यमाने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेशही देण्यात आला. रोटरी क्लबच्या अध्यक्ष डॉ. नीलिमा घुनागे व सरचिटणीस मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नरेशकुमार इंगळे यांच्यासह डॉ. संदेश राठोड, राजू अल्लाडा, सुनील गट्टाणी, पवार आदी उपस्थित होते. निर्माल्य संकलन रथ उपक्रमाची रोटरी क्लब व अनसूया माता सेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.