नऊ वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू!
By Admin | Updated: March 27, 2017 02:19 IST2017-03-27T02:19:04+5:302017-03-27T02:19:04+5:30
दापुरा येथील घटना; गावात शोककळा.

नऊ वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू!
मानोरा(वाशिम), दि. २६- तालुक्यातील ग्राम दापुरा येथील साक्षी विष्णू बोरकर (वय १२ वर्षे) ही मुलगी अंगणात खेळत असताना तिला सर्पदंश झाला. उपचारासाठी अमरावती येथे नेत असताना तिचा वाटेतच मृत्यू झाल्याची घटना २५ मार्च रोजी घडली.
प्राप्त माहितीनुसार, साक्षी ही घरासमोरील अंगणात खेळत असताना सापाने तिच्या पायाला चावा घेतला. सदर बाब शेजारी राहणार्यांच्या लक्षात आली. त्यामुळे तुकाराम तरासे आणि परिसरातील नागरिकांनी साक्षीला तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे साक्षीवर प्राथमिक उपचार करून प्रा. राजा गोरे, माजी नगराध्यक्ष संजय काकडे यांनी १0८ रुग्णवाहिकेद्वारे तिची अमरावतीच्या रुग्णालयाकडे रवानगी करण्यासाठी प्रयत्न केले; मात्र वाटेतच तिची प्राणज्योत मालवली. या घटनेने बोरकर कुटुंबीयासह दापुरा येथील गावकर्यांमध्ये शोककळा पसरली.