शेंदूरजना ‘पीएचसी’ला नवी रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:47 IST2021-08-14T04:47:16+5:302021-08-14T04:47:16+5:30
तालुक्यातील ग्राम पाळोदी येथे तरुणी विहिरीत पडल्याची घटना १६ जुलै रोजी घडली होती. यावेळी रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने वेळेवर उपचार ...

शेंदूरजना ‘पीएचसी’ला नवी रुग्णवाहिका
तालुक्यातील ग्राम पाळोदी येथे तरुणी विहिरीत पडल्याची घटना १६ जुलै रोजी घडली होती. यावेळी रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने वेळेवर उपचार न मिळाल्याने युवतीचा मृत्यू झाला. दरम्यान, या मुद्यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे ओम बलोदे, तालुका प्रमुख श्याम पवार यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयावर दुचकी मोर्चा काढला. शेंदूरजना प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी यासह रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी, इतर सोयीसुविधा देण्यात याव्या, अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रास नवी रुग्णवाहिका देण्याचे लेखी आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले होते. त्याची पुर्तता १२ ऑगस्ट रोजी करण्यात आली. १३ ऑगस्ट रोजी प्रहारचे ओम बलोदे, शाम पवार, शहराध्यक्ष गोलू वाळले, चेतन पवार, अमोल होलगरे, श्याम राठोड, ज्ञानेश्वर गोदमले आदिंच्या उपस्थितीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.