शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांची भाऊगर्दी; प्रमुख पक्षांची वाढली डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 15:48 IST

येत्या ७ जानेवारी २०२० रोजी जिल्हा परिषदेचे ५२ गट व पंचायत समितीच्या १०४ गणांसाठी होत असलेल्या निवडणूकीत १ हजार १४७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येत्या ७ जानेवारी २०२० रोजी जिल्हा परिषदेचे ५२ गट व पंचायत समितीच्या १०४ गणांसाठी होत असलेल्या निवडणूकीत १ हजार १४७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तथापि, उमेदवारांच्या या भाऊगर्दीने मतांचे विभाजन अटळ असल्याने प्रमुख राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, ३० डिसेंबर रोजी त्यातील जास्तीत जास्त उमेदवारांकडून माघार कशी घेतली जाईल, याकडे त्या-त्या गट व गणांमधील प्रमुख उमेदवारांसह नेतेमंडळींनी लक्ष केंद्रीत केल्याचे बोलले जात आहे.जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवर व बहुतांश पंचायत समित्यांवर सुरूवातीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. ते कायम ठेवण्यासाठी दोन्ही पक्षांनी यावेळी पुन्हा जनमानसात चांगली प्रतीमा असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उतरविले आहे. शिवसेनाही या निवडणूकीत नव्या दमाने उतरली असून भाजपानेही विजयाचे ‘व्हीजन’ ठेऊन आपले उमेदवार समोर केले आहेत. वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड आणि माजी खासदार देशमुख यांच्या जिल्हा जनविकास आघाडीनेही निवडणूकीत बाजी मारण्याकरिता संपूर्ण ताकद खर्च करणे सुरू केले आहे. दुसरीकडे प्रत्येक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवारी दाखल करून अनेकांनी रणशिंग फुंकले आहे. त्यामुळेच यंदा जि.प. व पं.स. निवडणूकीत तुलनेने उमेदवारांचा आकडा फुगल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, ५२ जिल्हा परिषद गटासाठी ५३१; तर १०४ पंचायत समिती गणांसाठी ८०२ असे एकंदरित १,३३३ उमेदवारी अर्ज दाखल असून ११४७ उमेदवार आहेत. त्या सर्वांनीच सद्या प्रचाराला वेग दिल्याने ग्रामीण भागात कडाक्याच्या थंडीतही निवडणूकीचा माहौल गरमागरम झाल्याचे पाहावयास मिळत आहे. ३० डिसेंबरला त्यापैकी किती अर्ज मागे घेतले जातात आणि प्रत्यक्षात किती उमेदवार लढतीत कायम राहतात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.पीक कर्जमाफीच्या निर्णयाचा लाभ पदरात पाडून घेण्याचा शिवसेना, काँग्रेस, रा.काँ.चा प्रयत्नराज्यात सत्तास्थापनेसाठी महाविकास आघाडी करून एकत्र आलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय मात्र शेवटपर्यंत घेतला नाही. त्यामुळे तीनही पक्षांचे उमेदवार स्वतंत्ररित्या लढतीत उतरले आहेत. असे असले तरी ऐन निवडणूकीच्या तोंडावर राज्य शासनाने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू करून शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे तथा २ लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्याचा लाभ पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न शिवसेना, काँग्रेस व रा.काँ.च्या उमेदवारांनी चालविल्याचे दिसून येत आहे. त्यात मतदार कुणाला किती पसंती देतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

भाजपा उमेदवारांसाठी अस्तित्वाची लढाईलोकसभा, विधानसभा निवडणूकीत वरचष्मा राहणाºया भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये मात्र फारसे यश मिळत नसल्याचा पुर्वेतिहास आहे. गतवेळी वाशिम जिल्हा परिषदेच्या ५२ पैकी ६ जागांवरच भाजपाला समाधान मानावे लागले होते. अशा स्थितीत होऊ घातलेली आगामी जि.प. व पं.स. निवडणूक या पक्षाच्या उमेदवारांसाठी अस्तित्व करणारी असेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

 

 

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद