नगर परिषदनजीक जीवघेण्या खड्ड्याकडे दुर्लक्ष; आराेग्य धाेक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:44 IST2021-01-13T05:44:25+5:302021-01-13T05:44:25+5:30
रिसाेड शहरांमध्ये सिव्हिल लाइन भागात पोलीस स्टेशनच्या डाव्या बाजूने जात असलेल्या अंतर्गत रस्त्यावर १०० बाय १०० आकाराचा मोठ्या ...

नगर परिषदनजीक जीवघेण्या खड्ड्याकडे दुर्लक्ष; आराेग्य धाेक्यात
रिसाेड शहरांमध्ये सिव्हिल लाइन भागात पोलीस स्टेशनच्या डाव्या बाजूने जात असलेल्या अंतर्गत रस्त्यावर १०० बाय १०० आकाराचा मोठ्या विहिरीप्रमाणे सांडपाणी व कचरा मिश्रित खड्डा आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधी सामना करावा लागत आहे तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाटसरुंना सुद्धा अतिशय त्रास होत आहे. हाकेच्या अंतरावर पोलिसांचे सभागृह अस्तित्वात असून, यामध्ये पोलीस वास्तव्य करतात. यामुळे पाेलिसांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. परंतु नगर परिषद प्रशासनाला याचे काहीही देणे-घेणे दिसून येत नाही. याबाबत नागरिकांनी नगर परिषदेकडे तक्रारी सुद्धा दिल्यात मात्र त्याची दखल घेण्यात न आल्याने नागरिकांमध्ये राेष व्यक्त केल्या जात आहे. नगर परिषदेला शासनाच्या वतीने कोटी रुपयांचा निधी दरवर्षी येताे, तसेच शहरवासीयांकडून टॅक्स इतर वसुली केली जाते, परंतु शहरातील स्वच्छताबाबत प्रशासन जागृत नसल्याचे दिसून येत आहे.