अन् कडूनिंबाची पाने झाली गोड  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 19:38 IST2017-08-18T19:37:56+5:302017-08-18T19:38:27+5:30

सायखेडा (मंगरुळपीर): कडवट चवीमुळे प्राणीही कधीच शिवत नसलेल्या कडूनिंबाची पाने चक्क गोड झाल्याचा प्रकार मंगरुळपीर तालुक्यातील गोलवाडी शेतशिवारात पाहायला मिळत आहे. याची संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू झाली असून, शेकडो लोकांनी थेट गोलवाडी येथे पोहोचून सदर कडूनिंबांच्या झाडाची पाने खाऊनही पाहिली आहेत. 

The neem leaves were made as sweet | अन् कडूनिंबाची पाने झाली गोड  

अन् कडूनिंबाची पाने झाली गोड  

ठळक मुद्देशेकडोंनी घेतली चवमंगरुळपीर तालुक्यातील गोलवाडी येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
सायखेडा (मंगरुळपीर): कडवट चवीमुळे प्राणीही कधीच शिवत नसलेल्या कडूनिंबाची पाने चक्क गोड झाल्याचा प्रकार मंगरुळपीर तालुक्यातील गोलवाडी शेतशिवारात पाहायला मिळत आहे. याची संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू झाली असून, शेकडो लोकांनी थेट गोलवाडी येथे पोहोचून सदर कडूनिंबांच्या झाडाची पाने खाऊनही पाहिली आहेत. 
गोलवाडी येथील शेतशिवारात खूप वर्षांपूर्वीच कडूनिंबाचे झाड आहे. या झाडाखाली  काही भाविकांनी श्रद्धेपोटी पाच दगड ठेऊन धामणगाव देव येथील मुंगसाजी महाराजांची प्रतिकृती मानत त्यांची पुजा करणे अनेक वर्षांपासून सुरू केले आहे. कडूनिंबाचे हे झाड दाट असल्याने शेतात जाणारे मजूर या ठिकाणी विसावा घेत असतात आणि श्रद्धेपोटी झाडाखाली ठेवलेल्या दगडांचे दर्शनही करतात. मागील दोन दिवसांपूर्वी असेच काही मजूर या झाडाखाली बसले आणि नकळत त्यामधील एकाने कडूनिंबाची पाने चघळली. त्यावेळी ती पाने त्याला गोड लागली. कडूनिंबाची पाने गोड लागल्यामुळे त्याने हा प्रकार इतर सहकाºयांना सांगितला. त्यांनीही पाने चावून पाहिली असता गोड लागली.  त्यांनी हा प्रकार गावातील लोकांना सांगितला. गावकºयांनीही या झाडाची पाने चावून पाहिली असता ती गोडच लागली. पाहता पाहता जवळपासच्या गावातही ही चर्चा पसरली आणि १८ आॅगस्ट रोजी शेकडो लोक या झाडाजवळ दाखल झाले. त्यातील काहींनी हा चमत्कार मानून झाडाखालील दगडांची मनोभावे पुजा केली. महिला, पुरुष, बालमंडळी सर्वांनीच या झाडाच्या पानांची चव गोड असल्याचे  सांगितले.

Web Title: The neem leaves were made as sweet