मिनी मंत्रालयात काँग्रेसच्या हातावर राष्ट्रवादीची घड्याळ कायमच !
By Admin | Updated: October 5, 2014 01:50 IST2014-10-05T01:50:16+5:302014-10-05T01:50:16+5:30
मालेगाव व वाशिम पंचायत समितीसह रिसोड, मंगरुळपीर न.प.मध्ये आघाडी.

मिनी मंत्रालयात काँग्रेसच्या हातावर राष्ट्रवादीची घड्याळ कायमच !
संतोष वानखडे/वाशिम
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने फारकत घेतली असली तरी, वाशिम जिल्हा परिषदेत मात्र दोन्ही काँग्रेस सत्तेचा संसार गुण्यागोविंदाने हाकत आहेत. राज्यस्तरावरील घटस्फोटाची ठिणगी जिल्हा परिषदेच्या संसारात काय ह्यआगह्ण लावते, यावर मिनी मंत्रालयाचे ह्यराजकारणह्ण अवलंबून आहे.
घटस्थापनेच्या दिवशीच झालेल्या दोन राजकीय घटस्फोटांमुळे महाराष्ट्राचे राजकारण निराळ्या वळणावर जाऊन उभे राहिले आहे. २५ वर्षांपासूनची शिवसेना-भाजपा युती व दीड दशके सत्तेच्या राजकारणात परस्परांना अवघड घडीतही हात देणारी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी तुटली. काँग्रेसच्या मुशीत तयार झालेल्या शरद पवारांनी स्वाभिमानाच्या मुद्यावर राष्ट्रवादीची स्वतंत्र चूल मांडली. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळे लढले आणि निकालानंतर दोघांनी एकत्र येऊन सरकारची स्थापना केली. २00४ व २00९ ची निवडणूक दोघांनी एकत्रितपणे लढविली आणि पुन्हा सरकार स्थापन केले. २0१४ मध्ये सत्ताधारी आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मैत्रीला सोळावं वरीस धोक्याचं ठरलं. १५ वर्षांची आघाडी फुटल्यानंतर जास्तीत-जास्त जागा स्वबळावर जिंकण्याचे आव्हान स्वीकारून दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. राज्यस्तरावरील घटस्फोटाचे लोण स्थानिक स्वराज्य संस्थेतही पोहोचेल, अशी शक्यता वर्तविली जात असतानाच, वाशिम जिल्ह्यात मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेत गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे सध्यातरी चित्र आहे.