वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:25 IST2021-07-03T04:25:45+5:302021-07-03T04:25:45+5:30

जनतेला दिलासा देण्यासाठी वाढती महागाई कमी करण्याची नितांत गरज असताना केंद्र सरकार दररोज पेट्रोल, डिझेल व गॅसमध्ये भरमसाठ भाववाढ ...

NCP's bear agitation against rising inflation | वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन

वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन

जनतेला दिलासा देण्यासाठी वाढती महागाई कमी करण्याची नितांत गरज असताना केंद्र सरकार दररोज पेट्रोल, डिझेल व गॅसमध्ये भरमसाठ भाववाढ करीत आहे. याविरोधात आज स्थानिक अकोला नाका येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष शुभदा नायक यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम तालुकाध्यक्ष संजय मापारी, मंगरुळपीर पं.स.चे माजी सभापती भास्कर पाटील शेगीकर, पवन राऊत, सूरज जोगदंड, अजय मोतीवार, जीवन महाले, परसराम ठाकरे, संतोष भोयर, आकाश आलमवार, दत्ता हजारे, अजय कांबळे, नितीन खडसे, शिवाजी महाले, सुधाकर कड, विशाल ठोकळ, नितीन जाधव, अनिल ठाकरे, प्रमोद खडसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी वाढती महागाई कमी करा, कमी करा, अशा घोषणा देत महागाई कमी करण्याची मागणी करण्यात आली. कोरोनाच्या नियमांचे पालन करून हे धरणे आंदोलन करण्यात आले.

Web Title: NCP's bear agitation against rising inflation