राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक साधणार पदाधिकाऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:28 IST2021-06-25T04:28:47+5:302021-06-25T04:28:47+5:30

वाशिम : जिल्हा परिषदेच्या रिक्त पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याबराेबर राजकीय हालचाली वाढण्यास सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षकसुध्दा आजी, ...

NCP inspector to interact with office bearers | राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक साधणार पदाधिकाऱ्यांशी संवाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक साधणार पदाधिकाऱ्यांशी संवाद

वाशिम : जिल्हा परिषदेच्या रिक्त पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याबराेबर राजकीय हालचाली वाढण्यास सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षकसुध्दा आजी, माजी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून निवडणुकीबाबत चर्चा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांनी दिली.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील ओबीसी आरक्षण रद्द करण्याबाबत दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आल्यानंतर रिक्त जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने २२ जून रोजी निवडणूक कार्यक्रम घोषित केला. त्यानुसार वाशिम जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समितीच्या २७ गणांसाठी १९ जुलै रोजी मतदान हाेणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून फिल्डींग लावण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी निरीक्षक डाॅ. संजय राेडगे २५ जून राेजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात संवाद साधणार आहेत.

Web Title: NCP inspector to interact with office bearers