शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे घराणेशाहीचा पक्ष  -पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 17:31 IST

रिसोड (वाशिम) : आजोबापासून ते नातवापर्यंत एकाच कुटुंबातील अनेकांना उमेदवारी दिली जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष ठरला आहे, अशी टीका राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

रिसोड (वाशिम) : आजोबापासून ते नातवापर्यंत एकाच कुटुंबातील अनेकांना उमेदवारी दिली जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष ठरला आहे, अशी टीका राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी केली. अकोला लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा-सेना युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ रिसोड येथील आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या.पंकजा मुंडे म्हणाल्या की, भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. जलयुक्त शिवार, स्वच्छ भारत मिशन, पंतप्रधान आवास योजना यासह अनेक कल्याणकारी योजनेतून सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी मानून विकासाची गंगा आणली आहे. ग्रामविकास विभागाच्या ‘२५:१५’ या लेखाशिर्षाखाली वाशिम-अकोला जिल्ह्यातही विकासात्मक कामांसाठी लाखो रुपयांचा निधी दिलेला आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच खालच्या पातळीवरचे राजकारण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तर आता एकाच कुटुंबातील अनेकांना उमेदवारी देत मतदारांवर घराणेशाही लादली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनीही अतिशय खालच्या पातळीवरचे राजकारण चालविले आहे. खालच्या पातळीवरचे राजकारण करणाºयांना जनता कधीही माफ करणार नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही यापेक्षा वेगळे नसून, त्यांच्याकडेही विकासाचा ठोस कार्यक्रम नसल्याची टिका मुंडे यांनी केली. यावेळी व्यासपिठावर अकोला लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खासदार संजय धोत्रे, आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार विजयराव जाधव यांच्यासह रिपाई ए, राष्ट्रीय समाज पार्टी, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना, भाजपा, शिवसेना पदाधिकाºयांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमakola-pcअकोलाPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाRisodरिसोडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक