शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

मानोरा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस फुटली; डझनावर कार्यकर्ते भाजपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 2:33 PM

मानोरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या डझनभर कार्यकर्त्यांनी शनिवारी भाजपात प्रवेश केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : राष्ट्रीय आणि राज्यपातळीवर पक्षबदलाचे वारे जोरात वाहू लागले असून, वाशिम जिल्ह्यातही हे लोण पसरत आहे. यात मानोरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या डझनभर कार्यकर्त्यांनी शनिवारी भाजपात प्रवेश केला. त्यात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांचे समर्थक उमेश पाटील ठाकरे व ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष देवनाथ पाटील भोयर यांचा समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभुमीवर ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे.गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षांतील नेते, पदाधिकाऱ्यांच्या पक्षांतराचे सत्रच सुरू झाले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. आता पक्षांतराचे लोण वाशिम जिल्ह्यातही पसरत असून, मानोरा तालुक्यातील राष्ट्रवादीचे युवा जिल्ह्याध्यक्ष उमेश ठाकरे व ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष तथा बाजार समितीचे माजी उपसभापती देवनाथ भोयर यांच्यासह डझनावर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँगे्रसला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला. यात पंचायत समिती सदस्य गजानन भवाने, नरेंद्र राऊत, विनोद ठाकरे, शेतकरी सुतगिरणी, दारव्हाचे संचालक विठोबा पाटील, कुपट्याचे सरपंच रवि दिघडे, कोलारचे माजी उपसरपंच विनोद पाटील, गोपाल धोटे व सचिन घोडे आदींचा समावेश आहे. मानोरा तालुक्यात विविध स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता गाजविणाºया पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :ManoraमानोराwashimवाशिमNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणBJPभाजपा