बगडिया महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:22 IST2021-02-05T09:22:37+5:302021-02-05T09:22:37+5:30
कार्यक्रमाच्या सुरुवातीस संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. मतदार जागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे असे ...

बगडिया महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम
कार्यक्रमाच्या सुरुवातीस संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. मतदार जागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे असे डॉ. प्रमोदकुमार नंदेश्वर यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विजयराव तुरुकमाने यांनी या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण होईल व ते राष्ट्रविकासाकरिता मतदान प्रक्रियेत सहभागी होतील असे आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. उपस्थितांनी संविधानिक मार्गदर्शक तत्वानुसार वर्तन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अजाबराव वानखेडे यांनी भारतातील मतदान स्थितीचे विस्तृत विश्लेषण करून आपल्या कर्तव्याप्रती नागरिकांनी जागृत रहावे असे आपल्या भाषणात सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन विष्णू पारीसकर यांनी तर आभार सुकेशनी वाघमारे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील डॉ किरण बुधवंत, प्रा. सुरेश जुंनघरे प्रा. ए. एन. बोंडे, प्रा संजय टिकार प्रा कांताराम वाघाडे डॉ. मंगल खेडेकर.. जयंत मेश्राम, डॉ. मनोज नरवाडे, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.