मानोऱ्यातील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:45 IST2021-09-26T04:45:16+5:302021-09-26T04:45:16+5:30

मासुपा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या औचित्यावर २५ सप्टेंबर रोजी एकदिवसीय ऑनलाइन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचा विषय राष्ट्रीय ...

National Service Plan Day at Manora College | मानोऱ्यातील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन

मानोऱ्यातील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन

मासुपा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या औचित्यावर २५ सप्टेंबर रोजी एकदिवसीय ऑनलाइन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचा विषय राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे देशभक्त चारित्र्यसंपन्न युवक घडविण्याचा कारखाना हा होता. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.एस. ठाकरे होते. त्यांनी रा.से.यो. स्वयंसेवकाने समाजासाठी व देशासाठी जगावे व राष्ट्रीय सेवा योजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव तयार होतो, यावर प्रकाश टाकला. कार्यशाळेला प्रमुख वक्ते म्हणून बुटले कॉलेज दिग्रसचे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रवीण मो. चांडक लाभले. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना का, कशासाठी झाली व रासेयोचा उद्देश काय, यावर मार्गदर्शन केले, तसेच कोविड-१९ मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा, या सर्व बाबींवर प्रकाश टाकला. या ऑनलाइन कार्यशाळेला विद्यार्थी व स्वयंसेवक, प्राध्यापक उपस्थित होते. ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन कार्यक्रम अधिकारी प्रा. महावीर धाबे यांनी केले. यावेळी महिला कार्यक्रम अधिकारी उपस्थित होत्या. रासेयो पथकाला व कार्यक्रम अधिकाऱ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.एस. ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. कार्यशाळेचे आभारप्रदर्शन रासेयो स्वयंसेविका दीपिका शर्मा हिने केले.

Web Title: National Service Plan Day at Manora College