‘बीजेएस’चे राष्ट्रीय अध्यक्ष आज जिल्ह्यात
By Admin | Updated: March 30, 2017 02:38 IST2017-03-30T02:38:12+5:302017-03-30T02:38:12+5:30
बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफ्फुल पारख यांचे गुरुवार ३0 मार्च रोजी वाशिम येथे आगमन होत आहे.

‘बीजेएस’चे राष्ट्रीय अध्यक्ष आज जिल्ह्यात
वाशिम, दि. २९- पाणी फाउंडेशनच्यावतीने आयोजित वाटरकप २ स्पर्धेत वाशिम जिल्हयातील कारंजा तालुकयाचा समावेश आहे.सदर स्पर्धेत भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने विचार विनीमय करण्यासाठी बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफ्फुल पारख यांचे गुरुवार ३0 मार्च रोजी वाशिम येथे आगमन होत आहे.
पाणी फाउंडेशनच्या माध्यमाने स्तुत्य असा उपक्रम हाती घेता आहे सदर उपक्रमाने प्रभावित होवून भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा पूणे यांनी सुद्धा पुढाकार घेवुन या उपक्रमात हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. सदर उपक्रमात जी गावे ङ्म्रमदानाचा टप्पा पूर्ण करतील अशा गावांना बीजेएसच्यावतीने पाच दिवस पोकलँड मशीन अथवा जेसीबी मशीन उपलब्ध करुन देण्याचा बीजेएसचा मानस आहे. त्यामुळे मुथा यांच्या आदेशावरुन बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफ्फुल पारख वाशिम व कारंजा येथे बैठकीसाठी उपस्थित राहणार आहे. गुरुवार ३0 मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता अकोला नाकास्थित जैन भवन येथे तर शुक्रवार ३१ मार्च रोजी कारंजा येथील वर्धमान मल्टीस्टेट बँकेच्या हॉलमध्ये सकाळी १0 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.