वाशिममध्ये १० एप्रिलला राष्ट्रीय लोक अदालत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:17 IST2021-03-04T05:17:58+5:302021-03-04T05:17:58+5:30

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये धनादेश अनादर प्रकरणे, बँकेचे कर्ज वसुली प्रकरणे, कामगाराचे वाद, विद्युत आणि पाणी देयकबद्दलची प्रकरणे व आपसात ...

National People's Court on April 10 in Washim | वाशिममध्ये १० एप्रिलला राष्ट्रीय लोक अदालत

वाशिममध्ये १० एप्रिलला राष्ट्रीय लोक अदालत

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये धनादेश अनादर प्रकरणे, बँकेचे कर्ज वसुली प्रकरणे, कामगाराचे वाद, विद्युत आणि पाणी देयकबद्दलची प्रकरणे व आपसात तडजोड करण्याजोगी फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई, वैवाहिक वाद, भूसंपदान प्रकरणे, इतर दिवाणी प्रकरणे (मनाई हुकुम दावे, विशिष्ट पुर्वबंध कराराची पूर्तता विषयक वाद) या संवर्गातील प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

ज्या पक्षकारांची नमूद प्रकारची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत किंवा खटलापूर्व प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत, त्यांनी १० एप्रिल रोजी आपली प्रकरणे आपसांत सामंजस्याने निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभाग नोंदवावा. संबंधित न्यायालय, तालुका विधी सेवा समिती अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सचिव पी.पी. देशपांडे व विधिज्ञ संघाच्या अध्यक्ष अ‍ॅड. छाया मवाळ यांनी केले आहे.

Web Title: National People's Court on April 10 in Washim