अरुंद रस्त्यांमुळे रुग्णालयांत जाणे जिकिरीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:46 IST2021-01-13T05:46:13+5:302021-01-13T05:46:13+5:30

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील दुर्दैवी घटनेनंतर सरकारी व खासगी रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणा, इलेक्ट्राॅनिक वायरिंग व्यवस्था याबरोबरच रुग्णालय परिसरातील ...

Narrow roads make it difficult to get to the hospital | अरुंद रस्त्यांमुळे रुग्णालयांत जाणे जिकिरीचे

अरुंद रस्त्यांमुळे रुग्णालयांत जाणे जिकिरीचे

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील दुर्दैवी घटनेनंतर सरकारी व खासगी रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणा, इलेक्ट्राॅनिक वायरिंग व्यवस्था याबरोबरच रुग्णालय परिसरातील अतिक्रमण, रस्त्यालगतच वाहनांची पार्किंग, अरुंद रस्ते आदी बाबीही चव्हाट्यावर येत आहेत. वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, मालेगाव, रिसोड, मंगरूळपीर, मानोरा, अनसिंग, कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालय आणि कारंजा उपजिल्हा रुग्णालय परिसरात सुदैवाने अतिक्रमण नसल्याने वाहने येण्यास व जाण्यास कोणताही अडथळा येत नाही. रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा व वाशिम शहरातील काही अरुंद रस्त्यालगत असलेल्या काही खासगी रुग्णालय परिसरात रस्त्यालगतच वाहनांची पार्किंग होते तसेच लघुव्यावसायिक हे विविध प्रकारची खेळणी व अन्य साहित्याचे हातगाडे, दुकाने थाटत असल्याने आपत्कालीन काळात अग्निशमन विभागाचे वाहन येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. रिसोड, मालेगाव, कारंजा शहरातील काही रुग्णालय हे मुख्य बाजारपेठ तसेच गल्लीबोळीत सुरू आहेत. यातील काही रुग्णालये अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. काही रुग्णालयांचे आपत्कालीन मार्गही अरुंद असल्याने अशा रुग्णालयास आग लागल्यास तिथे अग्निशमन विभागाची गाडी जाणेही कठीण होऊ शकते.

Web Title: Narrow roads make it difficult to get to the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.