बसस्थानकावरील अरूंद फलाट ठरताहेत घातक
By Admin | Updated: November 6, 2016 17:48 IST2016-11-06T17:48:29+5:302016-11-06T17:48:29+5:30
वाशिम बसस्थानकावर बसगाड्या उभ्या करण्याठी नियोजित असलेल्या फलाटाची रुंदी खुपच कमी असल्याने या ठिकाणी एकाच वेळी दोन बस दाखल झाल्यानंतर अपघाताची भीती आहे.

बसस्थानकावरील अरूंद फलाट ठरताहेत घातक
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 6 - येथील बसस्थानकावर बसगाड्या उभ्या करण्याठी नियोजित असलेल्या फलाटाची रुंदी खुपच कमी असल्याने या ठिकाणी एकाच वेळी दोन बस दाखल झाल्यानंतर अपघाताची भीती आहे. राज्य परिवहन मंडळाच्या बसस्थानकांवर बसगाड्या लावण्यात येणाºया फलाटांमधील अंतर जेमतेम तीन फुट असते. या ठिकाणी बस आल्यानंतर बसमध्ये चढण्यासाठी प्रवासी एकच गर्दी करतात. यावेळी प्रवाशांची आसनासाठी स्पर्धा सुरू असते. त्याचवेळी अशातच दुसरी बस तेथे आल्यानंतर दोन्ही बसच्या मध्ये उभे असलेल्या प्रवाशांची तारांबळ उडून एखाद वेळी मोठा अपघात घडू शकतो. प्रवाशांमध्ये महिला आणि बालकांचे प्रमाण मोठे असते. ही बाब अतिशय गंभीर असल्यामुळे बसस्थानकांवरील फलाटांचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न परिवहन मंडळाने करणे गरजेचे आहे. दोन फलाटांमधील अंतर अतिशय कमी असल्यानेच एका चालकाचा मागून येणाºया बसची धडक लागून मृत्यू झाल्याची घटना मागील वर्षी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे घडली होती, हे येथे उल्लेनीय आहे.