शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

‘नरेगा’च्या कामांना जिल्ह्यात ‘खो’

By admin | Updated: April 10, 2015 02:11 IST

२0१२ पासून १0५ तक्रारी; वाशिम जिल्ह्यात जेसीबीने कामे होत असल्याचा आरोप.

वाशिम : राष्ट्रीय रोजगार हमी योजना (नरेगा) अंतर्गत जिल्हय़ात सिंचन, पांदन रस्ते, प्लेविंग ब्लॉक, नाला सरळीकरण, रस्ता खडीकरण, वृक्षलागवड, गोठा बांधकाम आदी कामे झाली आहेत; परंतु ही कामे दर्जाहीन आहे, यात भ्रष्टाचार झाला यासह सन २0१२ पासून आतापर्यंंत यासंदर्भात जिल्हय़ातून १0५ तक्रारी झाल्या आहेत. रोहयोची कामे जेसीबीने होत असल्याच्या सर्वाधिक तक्रारींचा यात समावेश आहे. ग्रामीण विकासाला चालना मिळावी, या उदात्त हेतूने शासनाने सन २0१२ पासून राज्यात राष्ट्रीय रोजगार हमी योजना सुरू केली. रोजगाराच्या शोधार्थ गावातील मजुरांचे स्थलांतरण रोखण्याकरिता शासनाने या योजनेंतर्गत मजुरांना ह्यजॉबकार्डह्ण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे धोरण आखले. योजनेच्या माध्यमातून गावागावात सिंचनाची कामे, पांदन रस्त्यांची निर्मिती, प्लेविंग ब्लॉक, नाला सरळीकरण करणे, ग्रामीण भागांना जोडल्या जाणार्‍या रस्त्यांचे खडीकरण करणे, पर्यावरण संतुलनाकरिता ठिकठिकाणी वृक्षलागवड करणे आदी कामांची तरतूद शासनाने केली आहे. याकरिता शासनस्तराहून प्रत्येक तालुक्यासाठी भला मोठा निधीही देण्यात आला. मात्र, पंचायत समिती स्तरावरून या योजनेची चोख अंमलबजावणी झाली नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. सन २0१२ पासून या योजनेंतर्गत वाशिम तालुक्यातून १७, रिसोड १५, मालेगाव १४, मंगरुळपीर २७, मानोरा २१ आणि कारंजा तालुक्यातून ११ अशा एकंदरीत १0५ तक्रारी झाल्या आहेत. त्यात प्रामुख्याने शतकोटी वृक्षलागवड योजनेत झालेला भ्रष्टाचार, सिंचन विहिरीचा लाभार्थ्यांंना लाभ होत नसल्याचा मुद्दा, रोहयोची कामे जेसीबीने केली जात असल्याचा आरोप, रोजगार हमी योजनेच्या कामाचे पैसे न मिळणे, वाईगौळ येथे सरपंच, ग्रामसेवक, प्रभारी गटविकास अधिकारी कांबळे यांनी संगनमत करून ९७ हजार रुपयांचा भ्रष्टाचार केला, जॉबकार्ड वेळेवर न मिळणे आदी मुद्यासंदर्भातील तक्रारींसह इतर तक्रारींचा समावेश आहे.