‘नरेगा’च्या कामांना जिल्ह्यात ‘खो’
By Admin | Updated: April 10, 2015 02:11 IST2015-04-10T02:11:36+5:302015-04-10T02:11:36+5:30
२0१२ पासून १0५ तक्रारी; वाशिम जिल्ह्यात जेसीबीने कामे होत असल्याचा आरोप.

‘नरेगा’च्या कामांना जिल्ह्यात ‘खो’
वाशिम : राष्ट्रीय रोजगार हमी योजना (नरेगा) अंतर्गत जिल्हय़ात सिंचन, पांदन रस्ते, प्लेविंग ब्लॉक, नाला सरळीकरण, रस्ता खडीकरण, वृक्षलागवड, गोठा बांधकाम आदी कामे झाली आहेत; परंतु ही कामे दर्जाहीन आहे, यात भ्रष्टाचार झाला यासह सन २0१२ पासून आतापर्यंंत यासंदर्भात जिल्हय़ातून १0५ तक्रारी झाल्या आहेत. रोहयोची कामे जेसीबीने होत असल्याच्या सर्वाधिक तक्रारींचा यात समावेश आहे. ग्रामीण विकासाला चालना मिळावी, या उदात्त हेतूने शासनाने सन २0१२ पासून राज्यात राष्ट्रीय रोजगार हमी योजना सुरू केली. रोजगाराच्या शोधार्थ गावातील मजुरांचे स्थलांतरण रोखण्याकरिता शासनाने या योजनेंतर्गत मजुरांना ह्यजॉबकार्डह्ण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे धोरण आखले. योजनेच्या माध्यमातून गावागावात सिंचनाची कामे, पांदन रस्त्यांची निर्मिती, प्लेविंग ब्लॉक, नाला सरळीकरण करणे, ग्रामीण भागांना जोडल्या जाणार्या रस्त्यांचे खडीकरण करणे, पर्यावरण संतुलनाकरिता ठिकठिकाणी वृक्षलागवड करणे आदी कामांची तरतूद शासनाने केली आहे. याकरिता शासनस्तराहून प्रत्येक तालुक्यासाठी भला मोठा निधीही देण्यात आला. मात्र, पंचायत समिती स्तरावरून या योजनेची चोख अंमलबजावणी झाली नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. सन २0१२ पासून या योजनेंतर्गत वाशिम तालुक्यातून १७, रिसोड १५, मालेगाव १४, मंगरुळपीर २७, मानोरा २१ आणि कारंजा तालुक्यातून ११ अशा एकंदरीत १0५ तक्रारी झाल्या आहेत. त्यात प्रामुख्याने शतकोटी वृक्षलागवड योजनेत झालेला भ्रष्टाचार, सिंचन विहिरीचा लाभार्थ्यांंना लाभ होत नसल्याचा मुद्दा, रोहयोची कामे जेसीबीने केली जात असल्याचा आरोप, रोजगार हमी योजनेच्या कामाचे पैसे न मिळणे, वाईगौळ येथे सरपंच, ग्रामसेवक, प्रभारी गटविकास अधिकारी कांबळे यांनी संगनमत करून ९७ हजार रुपयांचा भ्रष्टाचार केला, जॉबकार्ड वेळेवर न मिळणे आदी मुद्यासंदर्भातील तक्रारींसह इतर तक्रारींचा समावेश आहे.