‘त्या’ नराधम शिक्षकाला न्यायालयीन कोठडी!

By Admin | Updated: March 3, 2017 00:51 IST2017-03-03T00:51:26+5:302017-03-03T00:51:26+5:30

कारंजा येथील न्यायालयाचा निकाल : मनभा येथील घटना

'That' Naradham teacher's judicial custody! | ‘त्या’ नराधम शिक्षकाला न्यायालयीन कोठडी!

‘त्या’ नराधम शिक्षकाला न्यायालयीन कोठडी!

कारंजा, दि.२ - तालुक्यातील मनभा येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या एका ९ वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेतीलच शिक्षकाने अतिप्रसंग केल्याची घटना मंगळवार २८ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी नराधम शिक्षकास ताब्यात घेत बुधवार १ मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
मनभा येथील शाळेत ९ वर्षीय विद्यार्थिनीवर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी शाळेकडे पाठ फिरवली. परिणामी, शाळेत विद्यार्थी संख्या रोडावल्याचे दिसून आले. नराधम शिक्षकाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केल्या गावकऱ्यांकडून केल्या जात आहे. मनभा येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतील मनोविकृत शिक्षक अब्दुल मतीन अब्दुल वहाब याने शाळेतील ९ वर्षाच्या चिमुकलीवर अतिप्रसंग केल्याचा प्रकार २८ फेब्रुवारी रोजी समोर आला.
याप्रकरणी पिडीत मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या फियार्दीवरुन पोलिसांनी या शिक्षकाविरूध्द भादंवि कलम ३७६, २ ब, फ, आय, व बाललैगिंक अत्याचार अधिनियम ३,४,५,६ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली होती. संंबंधित आरोपीला न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायाधिशांनी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Web Title: 'That' Naradham teacher's judicial custody!