राष्ट्रपुरुषांच्या यादीत राष्ट्रसंतांचे नाव हवेच!
By Admin | Updated: September 12, 2014 01:17 IST2014-09-12T01:17:04+5:302014-09-12T01:17:04+5:30
गुरुदेव सेवा मंडळ समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

राष्ट्रपुरुषांच्या यादीत राष्ट्रसंतांचे नाव हवेच!
अकोला: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत समाविष्ट करा, ही मागणी करीत अ.भा. श्री. गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम अंतर्गत श्री गुरुदेव सेवामंडळ, जिल्हा शाखा अकोलाच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रसंतांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी गुरुदेव भक्तांनी लढा उभारला आहे. गत एक महिन्यापासून विविध आंदोलने करण्यात येत आहेत. त्यानुषंगाने गुरुवारी राज्यभर गुरुभक्तांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.