नाले सफाई, रस्ता दुरूस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:41 IST2021-03-20T04:41:25+5:302021-03-20T04:41:25+5:30

नाले सफाई, रस्ता दुरूस्तीची मागणी वाशिम : शहरातील अकोला नाकानजीकच्या आनंदवाडी प्रभागात नाल्यांची सफाई, रस्ते दुरुस्ती आदी मूलभूत सुविधांचा ...

Nala cleaning, demand for road repairs | नाले सफाई, रस्ता दुरूस्तीची मागणी

नाले सफाई, रस्ता दुरूस्तीची मागणी

नाले सफाई, रस्ता दुरूस्तीची मागणी

वाशिम : शहरातील अकोला नाकानजीकच्या आनंदवाडी प्रभागात नाल्यांची सफाई, रस्ते दुरुस्ती आदी मूलभूत सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. प्रभागात असलेला हातपंपही अनेक महिन्यांपासून नादुरूस्त आहे. उद्भवलेल्या या समस्या तत्काळ निकाली काढाव्यात, अशी मागी मनसेने नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे १६ मार्च रोजी निवेदनाव्दारे केली.

आनंदवाडी प्रभागात रस्ते नादुरुस्त आहेत. रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नाल्यांची नियमित सफाई होत नाही. त्यामुळे नाल्यांमध्ये सांडपाणी साचून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. समस्या निकाली काढाव्यात, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना अमोल गाभणे, गजानन धोंगडे, मोहन कोल्हे, राजू किडसे, सुहास जाधव, वेदांत ढवळे, निखिल बुरकुले, विठ्ठल राठोड, नीतेश खडसे, समाधान खरे, राजू शिराळ, विनोद सरकटे, ज्ञानेश्वर खरे, अक्षय मोरे, पवन खरे, देवानंद खरे, गजानन मुखमाले, नितीन कदम, मंगेश गायकवाड, सागर खरे आदी उपस्थित होते.

Web Title: Nala cleaning, demand for road repairs