मंगरुळपीर नगर पालिकेच्या उपाध्यक्षांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 03:06 IST2017-07-20T03:05:26+5:302017-07-20T03:06:13+5:30

मंगरुळपीर : येथील नगर पालिकेच्या उपाध्यक्ष इंदुमती दामोदर लुंगे यांचे १९ जुलै रोजी आजारपणामुळे निधन झाले.

Nagarpalikar municipal vice president dies | मंगरुळपीर नगर पालिकेच्या उपाध्यक्षांचे निधन

मंगरुळपीर नगर पालिकेच्या उपाध्यक्षांचे निधन

मंगरुळपीर : येथील नगर पालिकेच्या उपाध्यक्ष इंदुमती दामोदर लुंगे यांचे १९ जुलै रोजी आजारपणामुळे निधन झाले. 
सहा महिन्यापुर्वी झालेल्या मंगरूळपीर नगर पालिका निवडणुकीत त्या भाजपातर्फे निवडून आल्या होत्या. त्यानंतर झालेल्या घडामोडीत नगर पालिकेच्या उपाध्यक्ष पदी त्यांची वर्णी लागली होती. दरम्यान आजारपणामुळे १९ जुलै रोजी त्यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६२ वर्षे होते. त्यांचे पश्चात पती, तीन मुले, दोन मुले, सुना, नातवंडे असा बराच आप्त परिवार आहे. १९ जुलै रोजी सायंकाळी येथील हिंदु स्मशानभूमी त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश लुंगे यांच्या त्या काकु होत्या.

Web Title: Nagarpalikar municipal vice president dies