स्वच्छ शहरासाठी नगरपालिका सरसावल्या!
By Admin | Updated: February 27, 2016 02:08 IST2016-02-27T01:28:00+5:302016-02-27T02:08:26+5:30
शौचालय बांधकामाला प्राधान्य: मानो-यातून ‘वराह’ होणार हद्दपार.

स्वच्छ शहरासाठी नगरपालिका सरसावल्या!
वाशिम: स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत (नागरी) जिल्ह्यातील चार नगर परिषद व दोन नगर पंचायत प्रशासनाने कृती आराखडा आखून शहर स्वच्छ व हगणदरीमुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकले आहे. मानोरा नगर पंचायतने पहिला प्रयत्न म्हणून शहरातील सर्व वराह शहराबाहेर हद्दपार करण्याचा निर्णय घेतला.
केंद्र सरकारच्या ह्यस्वच्छ भारत अभियानाह्णच्या धर्तीवर राज्य शासनाने ह्यस्वच्छ महाराष्ट्र अभियानह्ण (नागरी) सुरू केले आहे. या अभियानांतर्गत शहरी भाग हगणदरीमुक्त करणे, घनकचरा व्यवस्थापनांतर्गत शहरे स्वच्छ करणे या दोन प्रमुख बाबींचा समावेश आहे. वाशिम शहरात स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय योजना धुमधडाक्यात सुरू आहे. २0१७ पर्यंत चालणार्या या योजनेसाठी वाशिम नगर परिषदेकडे एक हजार वार्षिक उद्दिष्ट होते. २0 फेब्रुवारीपर्यंत ३२00 च्या जवळपास अर्ज प्राप्त झाले आहेत. ४३५ लाभार्थ्यांना शौचालयाचा लाभ देण्यात आला. या योजनेंतर्गत गत डिसेंबर १५ मध्ये ७0 लाभार्थ्यांंच्या बँक खात्यात धनादेशाची रक्कम, जानेवारी महिन्यात १00 जणांच्या खात्यात तर त्यानंतर जमा करण्यात आलेल्या धनादेशासह आतापर्यंत ४३५ लाभार्थ्यांंच्या खात्यात शौचालय बांधकामाची रक्कम जमा करण्यात आली. शहरातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण केले असता, चार हजार १२३ कुटुंबांकडे शौचालय नसल्याचे आढळून आले होते. रिसोड नगर परिषदेनेदेखील शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी शौचालय बांधकामाला प्राधान्य दिले आहे. शासनाचे अनुदान आणि नगर परिषद स्वत: १0 हजाराचे अनुदान देत असल्याने ६00 च्या वर शौचालय बांधकाम झाले आहे. मंगरुळपीर व कारंजा नगर परिषदेनेदेखील शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अँक्शन प्लॅन आखला असून, अंमलबजावणी सुरू आहे. १५ दिवसांपूर्वी सत्ता स्थापन झालेल्या मानोरा व मालेगाव नगर पंचायतच्या पदाधिकार्यांनीदेखील आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आढावा बैठकांवर भर दिल्याचे दिसून येते.