प्रगटदिनी होणारा नगर परिक्रमा सोहळा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:19 IST2021-03-04T05:19:13+5:302021-03-04T05:19:13+5:30
स्थानिक संत गजानन महाराज संस्थानकडून दरवर्षी प्रगटदिनानिमित्त विविध स्वरूपातील धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. प्रगटदिनी वाशिम शहरातील प्रमुख ...

प्रगटदिनी होणारा नगर परिक्रमा सोहळा रद्द
स्थानिक संत गजानन महाराज संस्थानकडून दरवर्षी प्रगटदिनानिमित्त विविध स्वरूपातील धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. प्रगटदिनी वाशिम शहरातील प्रमुख मार्गावरून ‘श्रीं’चा पालखी सोहळा निघतो. त्यात वाशिमच नव्हे; तर ग्रामीण भागातील शेकडो भाविक सहभागी होतात. शहरातील नागरिकांकडून ठिकठिकाणी पालखीतील भाविकांकरिता थंडपेय, फराळाची व्यवस्था केली जाते. महिलांकडून सडासंमार्जन करून रांगोळी काढण्यात येते. यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय होते. यंदा मात्र कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बहुतांश धार्मिक कार्यक्रम रद्द केले जात आहेत. त्यानुषंगाने ३ ते ५ मार्च या कालावधीत होणारा नगर परिक्रमा सोहळाही रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे परगावाहून येणाऱ्या दिंडी व भाविकांनी या सोहळ्यासाठी यंदा येऊ नये. मंदिर समिती व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन श्री संत गजानन महाराज सेवा समितीकडून करण्यात आले आहे.