नगर पंचायतचे पाणी प्रश्नासंबंधी घुमजाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:48 IST2021-09-05T04:48:14+5:302021-09-05T04:48:14+5:30
१ महिना उलटला तरी कार्यवाही नाही मालेगांव :- शहरातील पाणी प्रश्नासंबंधी सुनील शर्मा यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता, त्यामुळे ...

नगर पंचायतचे पाणी प्रश्नासंबंधी घुमजाव
१ महिना उलटला तरी कार्यवाही नाही
मालेगांव :- शहरातील पाणी प्रश्नासंबंधी सुनील शर्मा यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता, त्यामुळे त्यांचे आत्मदहन रोखण्यासाठी नगरपंचायतीने लेखी पत्र देऊन एक महिन्याच्या आत पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र याप्रश्नी नगरपंचायतीने घूमजाव केले असून अद्यापही काहीच केले नसल्याची आरोप सुनील शर्मा यांनी केला आहे.
सुनील शर्मा यांनी निवेदन दिले की, त्यांनी पाण्याच्या समस्याचे निवारण करण्याकरिता वारंवार अर्ज, लेखी माहिती, प्रकरण दाखल केलेली होती. त्यांच्या अर्जाचे निवारण न झाल्यामुळे पाणी समस्या दूर न झाल्यामुळे आत्मदहन करण्याचा विचार केला होता. चौकशी होऊन कार्यवाही करण्याचे लेखी अश्वासन मिळाल्याने आंदाेलन रद्द केले हाेते. १ महिन्याचा कालावधी उलटून गेला असून आजपर्यंत कोणताही पाणी समस्या सोडवली नाही आणि काेणतेही काम झालेले नाही.