नगर पंचायत कर्मचार्यांचे ‘काम बंद’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:30 IST2017-08-02T20:06:41+5:302017-08-03T01:30:37+5:30

नगर पंचायत कर्मचार्यांचे ‘काम बंद’ आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव - गुड मॉर्निंग पथकातील मालेगाव नगर पंचायतच्या एका कर्मचाºयाला २ आॅगस्ट रोजी उघड्यावर शौचास जाणाºया एका इसमाने मारहाण केली. या घटनेचा निषेध म्हणून बुधवारी नगर पंचायतच्या कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन केले.
याबाबत कर्मचाºयांनी मुख्याधिकाºयांना निवेदन दिले आहे. या निवेदनानुसार २ आॅगस्ट रोजी गुड मॉर्निंग पथकातील कर्मचाºयाने उघड्यावर शौचास जाणाºया लखन गोवर्धन अहीर यास अडवून समज दिली असता, त्याने कर्मचाºयास शिवीगाळ व मारहाण केली. शासकीय कामात अडथळा आणला. या घटनेच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन करण्यात आले.
निवेदनावर नगर पंचायत कर्मचारी मनोज सरदार, संतोष बनसोडे, महादेव ठाकरे, रवी शर्मा, गणेश भालेराव, प्रमोद हरणे, सतीश महाकाळ, माणिक मोहळे, अतुल बळी, सईद इरफान, गोपाल काटेकर, इंद्रायणी अवचार, संतोष खवले, शंकर बळी, शंकर इंगोले, अविकिरण काटेकर, विठ्ठल चोपडे, संजय दहात्रे, शेख सोहेल शेख सलीम, महादेव राऊत, पल्लवी शेळके, शेख बब्बू शेख मेहबूब, बबन पखाले, एकनाथ आढाव, प्रकाश बळी, नागनाथ माने, गजानन गायकवाड आदींच्या स्वाक्षरी आहेत.