‘संगीत’ हाच माझा श्वास
By Admin | Updated: September 8, 2014 01:45 IST2014-09-08T01:45:59+5:302014-09-08T01:45:59+5:30
बुलडाणा : सारेगमप फेम आर्या आंबेकरचे मत

‘संगीत’ हाच माझा श्वास
नीलेश शहाकार / बुलडाणा
शालेय जीवनापासून आत्मविश्वास व जिद्दीने सुरू केलेला संगीताचा प्रवास मला माझा स्व प्नांच्या दुनियेत घेऊन गेला. त्यामुळे संगीत हाच माझा श्वास बनला आहे. मार्गदर्शनाचे हात पाठीवर असले तर दिशा चुकत नाहीत, याचा अनुभव मला याच यशातून आला. आवड जो पासली की यशाचे शिखर गाठता येते. यासाठी प्रत्येक बालकलाकाराने यशासाठी आवड जो पासावी, असे मत लिटिल चॅम्प पंचरत्नातील आर्या आंबेकर हिने लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळ आयोजित राज्यस्तरीय बुलडाणा आयडॉल स् पर्धेच्या महाअंतिम सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी सारेगमप लिटिल चॅम्पची विजेती गायिका आर्या ही वडील डॉ. समीर आंबेकर आणि आई श्रृती यांच्याबरोबर बुलडाणा शहरात आली होती. आर्या पुढे म्हणाली, ज्याप्रमाणे झी मराठीचा लिटिल चॅम्पचा रंगमंच माझा संगीतमय प्रवासासाठी महत्त्वपूर्ण ठरला, त्याप्रमाणे बुलडाणा अर्बन समूहाकडून राबविणारे विविध कार्यक्रम लहान मुलं आणि युवकांसाठी यशाची नवी दार उघडणारी ठरणार आहे.
आपल्या आयुष्यातील आठवणींना उजाळा देताना आर्या म्हणाली, लहानपणी माझी आई श्रु ती ही संगीताचा रियाज करताना बोल कानावर पडत. मी दोन वर्षांची असताना आईच्या संगीतातील स्वर नकळत माझ्या तोंडून उमटले. ही उपजत कला जतन करण्यासाठी लहान पणापासूनच आईच माझी गुरू बनली. सहावीमध्ये शिक्षण घेत असताना स्नेहसंमेलनात पहिले गीत म्हटले. त्यानंतर निर्माण झालेल्या आत्मविश्वासाने विविध गायनाच्या स्पर्धांमध्ये मी सादरीकरण केले. तेव्हापासूनच संगीत क्षेत्रात नाव मिळविण्यासाठी माझा संघर्ष सुरू झाला. एखाद्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष करावाच लागतो, तो कधीही संपत नाही. यशाच्या शिखरानजीक असतानाही माझा संघर्ष सुरू आहे.
लिटिल चॅम्पच्या नावाने माझी स्वत:ची ओळख निर्माण झाली. ह्यकळीह्ण या मराठी चित्रपटा तील मी पहिले गीत म्हटले. त्यानंतर बा.भ. बोरकर यांच्या कवितेवर आधारित अल्बममध्ये ह्यसरीवर सरीह्ण हे गीत गाण्याची संधी मला मिळाली. ह्यदिवा लागू देरे देवाह्ण हा माझा सोलो अल्बम येत आहे, नुकत्याच आलेल्या रमा-माधव या मराठी चित्रपटासाठी मी शिर्षक गित गायले आहे. शिवाय योद्धा, परिहास हे चित्रपट आणि सुहासिनी मराठी मालिकेसाठी मी गायन केले आहे. पार्श्वगायिका लता मंगेशकार माझासाठी आदर्श असून, सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, सोनू निगम या गायकांसह संगीतकार विक्रम-शेखर, प्रीतम यांच्यासोबत काम करण्याची प्रचंड इच्छा असल्याचे तिने सांगितले. यावेळी बुलडाणा अर्बनचे संचालक डॉ. सुकेश झंवर आदींची उपस्थिती होती.