राज्यातील संगीत महाविद्यालयांचा ‘ताल’ बिघडला!
By Admin | Updated: October 17, 2014 00:38 IST2014-10-16T23:15:53+5:302014-10-17T00:38:31+5:30
४८ महाविद्यालयांतील तबला आणि हार्मोनिअम वादकांची पदे रिक्त.
राज्यातील संगीत महाविद्यालयांचा ‘ताल’ बिघडला!
वाशिम- राज्यातील विद्यार्थ्यांंना संगिताचे धडे देणार्या तब्बल ४८ संगीत महाविद्यालयांमधील संगिताचा ह्यतालह्ण बिघडला आहे. तबला आणि हार्मोनिअम वादकांच्या रिक्त पदांनी ही बाब अधोरेखित केली असून, याचा फटका विद्यार्थ्यांंना सोसावा लागत आहे. संगीत विषय शालेय, महाविद्यालयीन, तसेच विद्यापीठस्तरावर शिकविला जातो. राज्यात संगीत विषय शिकविणारी ४८ महाविद्यालये आहेत; मात्र दिवसागणिक या महाविद्यालयां तील संगिताचा सूर बिघडत चालला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या उदासिनतेमुळे या महाविद्यालयातील अनेक महत्वाची पदे रिक्त आहेत. काही पदे तर संपुष्टात येत आहेत. तबला वादक व हार्मोनिअम वादकांची पदे याचे उदाहरण आहे. संगीत शिक्षणासाठी, विशेषत: शास्त्रीय संगीत शिकविण्यासाठी तबला वादक व हार्मोनिअम वादकाची अत्यंत आवश्यकता असते; मात्र राज्यातील ४८ महाविद्यालयांमध्ये तबला व हार्मोनिअम वादकांची प्रत्येकी एक, अशी ९६ पदे आजमितीला रिक्त आहेत. उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्र. रा. गायकवाड यांनी १८ मे २0१२ रोजी प्रधान सचिवांकडे रिक्त पदे भरण्यासाठी प्रस् तावही सादर केलेला होता; मात्र अद्याप या प्रस्तावावर कारवाई झालेली नाही. महाविद्यालयांमध्ये संगीत कलावंत, शिक्षक, आकाशवाणी, दूरदर्शन, गीत व नाट्य विभाग, सांस्कृतिक विभाग या ठिकाणी नोकरीच्या अनेक संधी आहेत; मात्र तेथील रिक्त जागांवर नवीन नियुक्त्या करण्यासाठी संस्था आणि शासनानेही लक्ष देण्याची गरज आहे.