वाहन पार्किंग करण्याच्या वादातून युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:18 IST2021-03-04T05:18:09+5:302021-03-04T05:18:09+5:30

मंगरूळपीर तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून शेलुबाजार गाव ओळखले जाते. येथील प्रमुख चौकात वाहनांची वर्दळ असल्याने वाहतूक विस्कळीत होण्याचे ...

Murder of a youth over a dispute over parking of a vehicle | वाहन पार्किंग करण्याच्या वादातून युवकाची हत्या

वाहन पार्किंग करण्याच्या वादातून युवकाची हत्या

मंगरूळपीर तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून शेलुबाजार गाव ओळखले जाते. येथील प्रमुख चौकात वाहनांची वर्दळ असल्याने वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार नेहमीच घडतात. वाहन पार्किंग करण्यावरून कधी-कधी वाद उद्भवतात. दुचाकी व कार पार्किंग करण्यावरून आरोपी कुलदीप गाडवे आणि मृत युवक विठ्ठल पाणभरे यांच्यातही १ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास वाद उद्भवला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. कुलदीप गाडवे याने विठ्ठल पाणभरे याच्या पाठ आणि पोटावर चाकूने वार केले. यामध्ये विठ्ठल पाणभरे याचा मृत्यू झाला असून, मंगरूळपीर पोलिसांनी आरोपी कुलदीप गाडवे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी फरार झाला असून, मंगरूळपीर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार जाधव हे करीत आहेत.

Web Title: Murder of a youth over a dispute over parking of a vehicle