लग्नास नकार दिल्यामुळे महिलेची हत्या

By Admin | Updated: October 23, 2016 01:42 IST2016-10-23T01:42:36+5:302016-10-23T01:42:36+5:30

मंगरुळपीर येथील घटना.

The murder of the woman due to negation of marriage | लग्नास नकार दिल्यामुळे महिलेची हत्या

लग्नास नकार दिल्यामुळे महिलेची हत्या

मंगरुळपीर, दि. २२- लग्नास नकार दिल्याने आरोपीने महिलेचा धारदार हत्याराने खून केल्याची घटना शहरालगत जांब मार्गावर शनिवारी सकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. सीमा गजानन हिरे (३५) असे मृतक महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवराव रामजी सोनोने या इसमाने सीमा हिला लग्नाची गळ घातली होती. मात्र तिने नकार दिल्याने धारदार शस्त्राने गंभीर जखमी करुन महिलेचा खून केला. घटनेची माहिती मिळताच श्‍वासन पथक व ठसेतज्ञ यांना तात्काळ बोलावून प्रेताचा घटना स्थळावर पंचनामा करुन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी फिर्यादी छाया प्रमोद वर (३0) हिच्या तक्रारीवरून मंगरूळपीर पोलिसांनी आरो पी देवराव रामजी सोनोने विरुद्ध कलम ३0२ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

Web Title: The murder of the woman due to negation of marriage