शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

म्युकरमायकोसिस परतीच्या मार्गाला; एकाचाही डोळा निकामी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 11:49 AM

Mucomycosis : सुदैवाने आतापर्यंत एकाही रुग्णाला डोळा गमवावा लागला नाही.

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाबरोबरच म्युकरमायकोसिसही परतीच्या मार्गाला असून, सुदैवाने आतापर्यंत एकाही रुग्णाला डोळा गमवावा लागला नाही. दुसरीकडे आतापर्यंत चार रुग्णांची मृत्यू तर सात जणांनी या आजारावर मात केली आहे.जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. कोरोनावर मात केल्यानंतरही बुरशीमुळे होणारा आजार अर्थात म्युकरमायकोसिसचे रुग्ण जिल्ह्यात आढळून येत आहेत. मुख, दात, डोळ्यांवर आणि मेंदूवर आघात करणाऱ्या या आजारांवर वेळीच उपचार न मिळाल्यास जिवावरही बेतू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ‘म्युकरमायकोसिस’चे २३ रुग्ण आढळले. यापैकी चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर सात जणांनी या आजारावर मात केली. सध्या १२ जणांवर उपचार सुरू आहेत. अलीकडच्या काळात म्युकरमायकोसिसचे रुग्णही कमी संख्येने आढळून येत असल्याने म्युकरमायकोसिस परतीच्या मार्गाला असल्याचे दिसून येते. कोरोनातून बरे झालो म्हणून रुग्णांनी काही दिवस तरी स्वत:ची अधिक काळजी घेतली पाहिजे. कोरोनातून सुटलो म्हणजे बचावलो, असे समजून गाफिल राहू नका, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी रुग्णांना दिला आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे २३ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी चार जणांचा मृत्यू झाला तर सात जणांनी म्युकरमायकोसिसवर मात केली. वेळीच उपचार मिळाल्याने एकाही रुग्णाला डोळा गमविण्याची वेळ आली नाही.- डॉ. मधुकर राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसwashimवाशिम